पोलादपूर तालुक्यात १९० मिमी.पावसाची नोंद – अनेकांचे नुकसान, पंचनामे सुरू

पोलादपूर: पोलादपूर तालुक्यासह शहरी भागाला चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला असून बुधवारी दिवसभरात १४५ मिमी. पावसाची नोंद तर गुरुवारी ३६ मिमी. पावसाची नोंद झाली असून एकंदर तालुक्यात आज

 पोलादपूर: पोलादपूर तालुक्यासह शहरी भागाला चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला असून बुधवारी दिवसभरात १४५ मिमी. पावसाची नोंद तर गुरुवारी ३६ मिमी. पावसाची नोंद झाली असून एकंदर तालुक्यात आज मितीस १९० मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे सांगण्यात आले. गेले दोन दिवस लाईट नसल्याने अनेक कामे तसेच मोबाईल नेटवर्क नसल्याने बँकेतीक कामे रखडली असल्याचे ठिकठिकाणी पाहावयास मिळाले.

कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ घोंगावत असतात त्याचा तडाखा पोलादपूर शहरासह तालुक्यातील गावागावात बसला आहे. या वादळात  तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचे पत्रे , कौले उडाले. झाडे कोसळली. विद्युत पोल वाकले, तारा तुटल्या. यामुळे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले आहे. या वादळात लाखो रुपयांची वित्तहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त प्राप्त झाले आहे. नुकसान झालेल्या घराचे शासकीय इमारतीचे पंचनामे युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत. तालुक्यातील तुर्भे खोरा कामथे खोरा सह आसपासच्या गावात मुसळधार पाऊस बरसला असून तालुक्यातील कोरड्या पडलेल्या नद्यांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले आहे. मान्सून पूर्व पावसाने पोलादपूरची दैना उडवली असून अवकाळी पावसात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी ग्रामस्थ भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये तालुक्यातील शासकीय इमारत आणि काही शाळा, अंगणवाडीसह घराचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्वाचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे