पोलादपूरमध्ये दूषित पाण्याचा होतोय पुरवठा, नळातल्या पाण्यात बेडूक आढळल्याने नागरिक त्रस्त

पोलादपूर: पोलादपूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली असली तरी अद्याप पोलादपूर नगरपंचायतमध्ये पाण्याचे फिल्टरेशन होत नसल्याने अद्याप जैसे थे पाणी पुरवठा होत आहे. त्यातच कडक उन्हात ज्या ठिकाणी पाणी उचलले

पोलादपूर: पोलादपूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली असली तरी अद्याप पोलादपूर नगरपंचायतमध्ये पाण्याचे फिल्टरेशन होत नसल्याने अद्याप जैसे थे पाणी पुरवठा होत आहे. त्यातच कडक उन्हात ज्या ठिकाणी पाणी उचलले जाते ते तळाला गेले असल्याने मोटरद्वारे, पाईपद्वारे दूषित पाणी येत आहे. त्या पाण्यात बेडूक आढळल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहारातील शिवाजी नगर येथील  आनंद पांढरकामे याच्या घरातील नळाला सकाळी लहान बेडकांचे पिल्लू आढळून आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील पाणी पुरवठा करण्यात येणारे पाणी थेट येत असल्याने ते फिल्टर करण्यात येणे गरजेचे आहे. मात्र हा प्लांट नसल्याने सरसकट पाणी वाटप होत असल्याने व ज्या भागातून पाणी येते त्या ठिकाणी चे पाणी पुरवठा कमी झाल्याने पाण्यासह बेडूक सह इतर जंतू येत असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यापुर्वी साठवण टाकीसह इतर नळ पाणी पुरवठा करणाऱ्या साहित्याची सफाई होणे गरजेचे बनले आहे.मात्र कोरोनाची पाश्वभूमीवर अनेक ठिकाणची सफाई रखडली आहे. अनेक नळ जमिनीखालून गटारातून गेले आहेत. तर काही ठिकाणी पाणी वाहून नेणारे पाईप गंजून गेले आहेत. अशा ठिकाणी  अनेकदा पाण्याद्वारे जंतू कीटक वाहत थेट नळाद्वारे येत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता तातडीने नळाची तपासणी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.  कोरोनाच्या  महामारीमुळे कामांना स्थगिती असल्याने साठवण टाकी व फिल्टरेशनचे काम करता आले नाही. पाण्याची पाईपलाईन विस्तार वहिनी यातून आलेले बेडूक ही गंभीर बाब असल्याने आता विस्तारवाहिनी पाईपलाईनला जाळी लावून वॉश आऊट करून घेऊ. येत्या दोन दिवसांमध्ये योग्य ते निवारण करू अशी माहिती माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांनी दिली आहे 
या घटने नंतर पोलादपूर मनसेच्या वतीने मुख्याधिकारी पोलादपूर यांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये राहिवाशांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून त्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नगर पंचायतीच्या माध्यमातून साठवण ठाकी व पाईपलाईन जलशुद्धीकरणाची तपासणी सह दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे.