गोमांस नेणारे दोन आरोपी कारसह नागोठणे पोलिसांकडून जेरबंद : सुकेळी जवळील धक्कादायक घटना 

नागोठणे शहर (Nagothane City) व परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी गुरे चोरण्याचा प्रयत्न झालेला असतांनाच नागोठणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. 

नागोठणे : नागोठण्याजवळील ( Nagothane ) सुकेळी (Sukeli ) गावाच्या हद्दितील महामार्गालगत उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या होंडा सिटी कारमधून (Honda City Car)  सुमारे ५२४ किलो वजनाचे व सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे तुकडे केलेले गोमांस जप्त (carrying beef) करण्याची कामगिरी नागोठणे पोलिसांनी रविवारी (दि.२९) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास केली असून त्यासह मुंबईतील (Mumbai) दोन आरोपींनाही जेरबंद केले आहे. नागोठणे शहर (Nagothane City) व परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी गुरे चोरण्याचा प्रयत्न झालेला असतांनाच नागोठणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वर सुकेळी गावाच्या हद्दितील खैरवाडी आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासमोरच पुनावाला फार्महाऊस आहे. या फार्महाऊस जवळच मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईडे जाणारी काळ्या रंगाची एक होंडा सिटी कार संशयास्पद रित्या रोडच्या बाजूला असल्याची माहिती वाकण पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरिक्षक पी.बी.भोईर यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह तात्काळ जाऊन खात्री केली असता, गाडीतून कुजल्या सारखा वास येत असल्याचे तसेच गाडीवर माशा बसलेल्या असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकाराची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे सुध्दा त्वरित घटनास्थळी गेले. उपस्थित अधिका-यांची खात्री झाली की, गाडीमध्ये गुरांचे मांस आहे.  त्याचवेळी गाडी दुरूस्त करण्यासाठी फोन केलेला एक मेकॅनिकल गाडीजवळ आला. त्याच्याकडून माहिती घेऊन त्यानुसार साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शोध घेतला असता सुकेळी येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेल विजय येथून कारमधील अस्लम कुरेशी (वय २५) रा. कुरेशी नगर कुर्ला व युनूस इसाक शेख (वय ४०) रा. गोवंडी रेल्वे स्थानक जवळ या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता गुरे चोरणाऱ्या टोळ्यांच्या प्रकरणी काही धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम व वन्य जीव पशु-पक्षी व प्राणी सुधारणा अधिनियम अंतर्गत विविध कलमाखाली नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी नागोठणे पोलीस पुढील तपास करीत आहेत.