पोलीस अधिकारी,कर्मचारी शिबीरात ४५ बाटल्या रक्त संकलन

इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदाण शिबीराचे आयोजन इंदापूर : महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीने रौद्र रूप धारण केले असुन, दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संखेंत वाढ होत आहे. या संदर्भात राज्य

इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदाण शिबीराचे आयोजन
इंदापूर : महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीने रौद्र रूप धारण केले असुन, दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संखेंत वाढ होत आहे. या संदर्भात राज्य सरकारने चिंता व्यक्त केली होती. तर राज्यात रक्तचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागील आठवड्यात जाहीर केले होते. त्या अणुषंगाने इंदापूर पोलीस प्रशासनाच्यावतीने इंदापूर पोलीस स्टेशन आवारात पोलीस बांधवाचे रक्तदाण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरात सहभागी होउन ४५ बाटल्या रक्त संकलीत केल्याची माहीती गुप्त वार्ता विभागाचे गणेश झरेकर यांनी दीली.

रविवारी सकाळी नऊ वाजता इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांचे हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीदीनी त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोहकरे, शिरीष लोंढे, अजित जाधव,दाजी देठे,बीरोबा लातुरे, डाॅ.सागर दोशी, डाॅ.अणुजा दोशी, डाॅ.समीर मगर, महेश निंबाळकर आदी उपस्थित होते.