खासदार सुनिल तटकरे यांच्या म्हसळा येथील शासकीय आढावा बैठकीचा सकारात्मक परिणाम

निसर्ग चक्रीवादळात (Nature's Hurricane) नैसर्गिक आपद्ग्रस्तांना शासनाने देवू केलेली मदत ४ महिने उलटूनही म्हसळा (Mhasala ) तालुक्यातील अनेक गावांतील लाभार्थ्यांना मिळण्यास विलंब झाल्याने तालुक्यात लोकांचा मोठया प्रमाणावर तक्रारीचा सुर वाढला होता. याबाबत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी लागलीच दखल घेत दिनांक ७ सप्टेंबर रोजी म्हसळा येथे शासकीय अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेऊन येत्या ३ ऑक्टोबर पर्यंत रखडलेली विकास कामे आणि नैसर्गिक आपद्ग्रस्तांच्या सर्वच तक्रारींचे निवारण करून हा विषयच संपवून टाकावा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा निर्वाणीचा दिला होता. त्यानुसार आता कामाला सुरुवात होताना दिसत आहे.

म्हसळा : दि. ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात (Nature’s Hurricane) नैसर्गिक आपद्ग्रस्तांना शासनाने देवू केलेली मदत ४ महिने उलटूनही म्हसळा (Mhasala ) तालुक्यातील अनेक गावांतील लाभार्थ्यांना मिळण्यास विलंब झाल्याने तालुक्यात लोकांचा मोठया प्रमाणावर तक्रारीचा सुर वाढला होता. याबाबत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी लागलीच दखल घेत दिनांक ७ सप्टेंबर रोजी म्हसळा येथे शासकीय अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेऊन येत्या ३ ऑक्टोबर पर्यंत रखडलेली विकास कामे आणि नैसर्गिक आपद्ग्रस्तांच्या सर्वच तक्रारींचे निवारण करून हा विषयच संपवून टाकावा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा निर्वाणीचा दिला होता. त्यानुसार आता कामाला सुरुवात होताना दिसत आहे.

खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका तहसीलदार, महसूल विभाग, कृषी, बांधकाम, पंचायत समिती, पाणी पुरवठा, दुरसंचार, मराविमच्या संबंधित अधिकारी वर्गाला सुचित केल्या नुसार त्यांचे आदेशाची गंभीर दखल घेत म्हसळा तालुक्यातील लहान मोठया विकास कामांना सुरुवात झाली तर नैसर्गिक आपत्ती बाबतीतही जनतेच्या तक्रारिचे झटपट निवारण होत आहे. या कामी तहसिल कार्यालयात स्वतंत्र टेबल लावुन कामकाज पाहिले जात आहे. म्हसळा पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाला गती मिळाली आहे, राज्य मार्गावरील नादुरुस्त जोड रस्त्याचे दुरुस्ती कामाला सुरूवात झाली आहे.

शासन मंजुरी झालेल्या विकास कामांची टेक्निकल मंजुरी देण्याचे कामास गती मिळाली आहे. प्रेमाने सांगूनही जनतेची काम होत नाहीत म्हणुन खासदार सुनिल तटकरे यांनी कामचुकार अधिकारी यांचे बोलुन वेळीच नाक दाबल्याने त्यांनी आता हाताने काम करण्यास सुरुवात करून अप्रत्यक्षपणे तोंडे उघडली आहेत अशी खमंग चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाने म्हसळा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तग्रस्तांसाठी मदत म्हणुन ५४ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे त्या पैकी ३४ कोटी ३ लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले आहे तर उर्वरित रक्कम ३ ऑक्टोबरच्या आधीच वितरित करा अशा अधिकारी वर्गाला सुचना केल्या नुसार तशा प्रकारे कामकाज होत असताना तहसिल कार्यालयात भेट घेतली असता निदर्शनास आले.

श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी विभागाचे सर्वच अधिकारी वर्गाला खासदार तटकरे यांनी सुचित केल्या प्रमाणे कामकाज करा अशी सक्त ताकीद म्हसळा तहसिल कार्यालयातील बैठकीत दिली आहे. खासदार सुनिल तटकरे यांनी जनतेच्या तक्रार निवारण बाबत श्रीवर्धन मतदार संघातीच्या ३ ऑक्टोबरच्या आयोजित आढावा सभेत पुन्हा सांगितलेल्या कामांची व आदेशाचा आढावा घेणार आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांनी सुचविलेल्या उपाययोजनांना म्हसळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना प्रादुर्भाव बाबतीत लोक गांभीर्याने घेत नसल्याचे खासदार सुनिल तटकरे यांना निदर्शनास आले त्यांनी लागलीच संबंधीत अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्त करून मास्क लावणे अनिवार्य करा व अँटीजंट टेस्ट करण्याची सक्त ताकीद दिली असता आता म्हसळा शहरात ९८ टक्के लोकांच्या तोंडावर मास्क दिसत आहे तर ग्रामीण रुग्णालयात रोजच ४० ते ५० जणांची अँटीजंट टेस्ट करून दिली जात आहे.

या कामी खासदार सुनिल तटकरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे करवी १००० तपासणी किटची उपलब्धता करून दिली आहे. अनलॉक – ४ संपल्यावर गणेशोत्सव काळात म्हसळा शहरात सोशियल डिस्टन्स, मास्क लावणे आणि अन्य काळजी घेण्याचे बाबतींत लोकांनी दुर्लक्षित केल्याने तालुक्यात आता रोज चार ते पाच कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलिस प्रशासनाचे मदतीने म्हसळा नगरपंचायतीने दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे तसेच नगर पंचायतीच्या अध्यक्षा जयश्री कापरे यांनी दवंडी देत सोशल मिडियाचे माध्यमातून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.