महावितरण भांडूप परिमंडलच्या वाशी मंडळ अंतर्गत अनेक भागाचा वीजपुरवठा सुरळीत

पनवेल : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे, सर्वात जास्त नुकसान भांडूप परिमंडलातील वाशी व पेण अंतर्गत अनेक भागात झाले आहे. चार दिवसापासून

पनवेल :  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे, सर्वात जास्त नुकसान भांडूप परिमंडलातील वाशी व पेण अंतर्गत अनेक भागात झाले आहे. चार दिवसापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करून अनेक भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर आणला आहे. 

राज्याचे ऊर्जामंत्री  डॉ. नितीन राऊत यांनी चक्रीवादळाच्या दुसर्‍या दिवशी पहाटे रायगड जिल्हाची पाहणी केली तसेच ६ तारखेला व्हिडिओ कॉन्फरन्द्वारे आढावा घेतला. या बैठकीत, ऊर्जामंत्रीनी वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी लागणारा मनुष्यबळ व आवश्यक निधी पुरविण्याचे सांगितले. 

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे वाशी मंडळातील उरण, पनवेल शहर, कळंबोली वसाहत, खारघर, नवीन पनवेल, घणसोली, तळोजा, ऐरोली, महापे, वाशी, जुईनगर, तुर्भे व इतर भागातील १७ उपकेंद्र  व १८८ वाहिन्या बाधित झाले होते. मात्र, त्याच दिवशी युद्ध पातळीवर काम करून त्यातील १६  उपकेंद्र व १६७ वाहिन्या चालू करण्यात महावितरणचे कर्मचारी यशस्वी झाले.

पनवेल शहर एस.टी स्टॅन्ड, ठाणे नाका, खांदा गाव येथील वीजपुरवठा विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने बाधित झाला होता. परंतु, दुसऱ्या वाहिनी वरून वीजपुरवठा चालू करण्यात आला.साईबाबा वाहिनीवर ७-८ मोठी झाडे पडल्याने पोल मोडला गेला होता, तसेच ४०-सी कॉलनी येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाडे हटवून घेऊन, तेथील वीजपुरवठा चालू करण्यात आला.कळंबोली उपविभागातील स्टील मार्केट येथील २४ रोहित्रांचा वीजपुरवठा त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत काम करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी चालू केला. खारघर परिसरातील वीजपुरवठाही त्याच दिवशी सायंकाळी पूर्ववत करण्यात आला होता. 

पनवेल (भिंगरी) उपविभागातील तळोजा, नावडे, एम. आय. डी. सी., आदर्श नगर, तोंडरे, खुदारी, वावंजे, गव्हाण, शेंडघर, शिवाजीनगर, कारंजडे, पारगाव या भागातील ५९ वाहिन्या, १६  उपकेंद्र, २२३ रोहित्र,  चक्रीवादळामुळे बाधित झाले  होते. परंतु, त्याच दिवशी ५२ वाहिन्या, १६ उपकेंद्र, व १०१ रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून १७७ वीज कामगार व ठेकेदार यांच्या मदतीने वाहिन्या दुरुस्तीचे  काम हाती घेण्यात आले होते व ५ तारखेला  सायंकाळ पर्यंत उर्वरित सर्व  वाहिन्यांना वीजपुरवठा पूर्ववत केला आहे, ९८ रोहित्रांवरील वीजपुरवठा बाधित असून ३१ रोहित्र वरील वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे, तळोजा, गव्हाण, पारगाव इतर गावातील वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे.

महावितरण कंपनीचे ‘निसर्ग ‘ वादळामुळे वाशी मंडळाचे बरेच नुकसान झाले असल्याचे, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता, राजाराम माने यांनी सांगितले.तसेच अनेक वीज ग्राहकानी सहकार्य केल्याबद्दल  त्यांचे आभार मानले आहे.भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी  स्वतः वाशी मंडळात जाऊन पाहणी करून वीजपुरवठा जलदगतीने सुरु करण्याचे निर्देश दिले होते.