
पनवेल : कोकणातले मराठी साहित्य अनेक अंगांनी समृद्ध झाले आहे. प्रतिभेच्या साहित्य क्षेत्रातील कोकणातील अनेक मान्यवरांनी महाराष्ट्राला दिशा देईल असे साहित्य निर्माण केले आहे, असे मत भाजपचे उत्तर रायगड
पनवेल : कोकणातले मराठी साहित्य अनेक अंगांनी समृद्ध झाले आहे. प्रतिभेच्या साहित्य क्षेत्रातील कोकणातील अनेक मान्यवरांनी महाराष्ट्राला दिशा देईल असे साहित्य निर्माण केले आहे, असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाईन कवी संमेलनाच्या तिसऱ्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. या कविसंमेलनाला सुप्रसिद्ध अभिनेत्री नयन पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकणच्या मातीने महाराष्ट्राला राजकीय क्षेत्रात प्रतिभावंत आणि देशाचे नेतृत्व करणारे नेते दिले आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये वेगळ्या बंधनामध्ये सगळे जण बांधले गेलो आहेत.सामाजिकदृष्ट्या एकत्र येणे शक्य नसल्याने तंत्रज्ञानाच्या अंगाने ऑनलाईईन कवी संमेलन ही एक कवींना संधी आहे. या कविसंमेलनात साहित्यातले वेगळे प्रकार तसेच वेगवेगळे विषय कवितांमधून सादर केले जातील,अशा अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध अभिनेत्री नयन पवार यांनी कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळातील ऑनलाईन कवी संमेलनाची संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. हा उपक्रम नवोदित साहित्यिकांना एक संधी आहे .हे कवी संमेलन केवळ लॉकडाऊन पुरते न ठेवता यापुढे सातत्याने ठेवावे अशा सूचना केल्या.