कोटामधल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना परत आणण्याचे नियोजन करा- आ.प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल: राजस्थानमधील कोटा येथे नीट २०२० परिक्षेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप आणण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार

पनवेल: राजस्थानमधील कोटा येथे नीट २०२० परिक्षेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप आणण्यासाठी  राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास १ हजार  विद्यार्थी   नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथे गेलेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी केंद्र सरकारने आधी १४ एप्रिल आणि नंतर ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आपल्या घरी परतण्यासाठी अडचण  निर्माण झाली आहे . या  विद्यार्थ्यांची तेथे राहण्या-खाण्याची गैरसोय होत आहे अशा तक्रार त्यांच्या पालकांनी केलेल्या आहेत. अनेक राज्यांनी त्या राज्यातील  विद्यार्थ्यांना पालकांच्या विनंतीवरून विशेष बसेसच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे पालन करून आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली आहे.महाराष्ट्र शासनाने देखील राजस्थान कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आपल्या घरी सुखरूप पोहोचावेत, यासाठी आपल्या स्तरावर तातडीने नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.