नरवीर तानाजींबद्द्लच्या चुकीच्या विधानासाठी प्रताप सरनाईकांनी नतमस्तक होऊन माफी मागावी; नाही तर… 

पोलादपूर : नरवीर तानाजी मालुसरेंसारखा धारातिर्थी पडणारा मी सोळाव्या शतकातील मावळा नाही. मी २१व्या शतकातील मावळा असून धारातिर्थी पडणार नाही असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी  इडीच्या चौकशीनंतर केले होते.

सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे नरवीर प्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी नरवीर तानाजी मालुसरेंप्रती केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी अन्यथा राज्यात देशात सर्वत्र तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरीटेबल ट्रस्ट उमरठचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिला.

नरवीर तानाजी मालुसरेबाबत बोलताना प्रताप सरनाईकांना कदाचित इतिहासाचे भान नसेल.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अनेक शूरवीरांनी कुटूंबियांवर तुळशीपत्र ठेऊन प्राणांची आहुती दिली.

सरनाईक यांनी त्यांचे वाक्य मागे घ्यावे. अखंड महाराष्ट्रातील मालुसरे परिवार आणि नरवीरप्रेमींनी याठिकाणी या नरवीरभूमीतून संताप व्यक्त करण्यासाठी उपस्थिती दर्शविली, असल्याचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी म्हटले आहे.