कोरोना संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता द्या – प्रितम म्हात्रे यांची पनवेलच्या आयुक्तांकडे मागणी

पनवेल : पनवेलमध्ये कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव वाढत असताना आपले योगदान देणाऱ्या व त्या संदर्भात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका, पालिका शिक्षक आणि कोरोना संबंधित काम

 पनवेल : पनवेलमध्ये कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव वाढत असताना आपले योगदान देणाऱ्या व त्या संदर्भात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका, पालिका शिक्षक आणि कोरोना संबंधित काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे  केली आहे.

 संपूर्ण देशासह राज्यात व पनवेलमध्ये कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. कोरोनाच्या साथीमुळे सारी जनता भयभीत झालेली आहे प्रत्येकाला आपला जीव प्यारा असला तरी हा परिस्थितीमध्ये एक योध्या प्रमाणे सर्व डॉक्टर, परिचारिका, पोलीस प्रशासन, वॉर्डबॉय, पालिका, तहसील, प्रांत, प्रशासकीय अधिकारी, पालिका शिक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना सोबत लढताना दिसत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ४ मेपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर गेलेली आहे. यापैकी ३५ पेक्षा अधिक रुग्ण बरे झालेले आहेत पनवेल तालुक्यात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेला कोणी पैशाच्या स्वरूपात तर कोणीच सामानाच्या स्वरूपात सहकार्य करून योगदान देत आहेत. डॉक्टर, परिचारिका आणि शिक्षक आपला जीव धोक्यात टाकून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने कठीण परिस्थितीत आपले योगदान देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका, पालिका शिक्षक आणि कोविड संबंधित काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता द्यावा, अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.