महाराष्ट्र राज्यातील भूमिपुत्रांसाठी रोजगार समिती स्थापन करा – प्रितम म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल : कोरोनासदृश्य परिस्थिती आटोक्यात आल्यावर निर्माण होणारे महाराष्ट्रावरचे आर्थिक आणि बेरोजगारीचे संकट निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील भूमिपुत्रांसाठी रोजगार समिती स्थापन करण्याची

 पनवेल : कोरोनासदृश्य परिस्थिती आटोक्यात आल्यावर निर्माण होणारे महाराष्ट्रावरचे आर्थिक आणि बेरोजगारीचे संकट निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील भूमिपुत्रांसाठी रोजगार समिती स्थापन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

महाराष्ट्रातील जनजीवन पूर्वपदावर आल्यावर जे आर्थिक संकट, बेरोजगारी निर्माण होणार आहे , त्यासंदर्भातील चिंता सतावत आहे. परंतु सदर गोष्टीचा  जाणीवपूर्वक विचार केला असता सद्यस्थितीला महाराष्ट्रातील हजारो परप्रांतीय जे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते असे कामगार आपापल्या गावाकडे जात आहेत. त्यांना पाठवण्यासाठीसुद्धा महाराष्ट्र सरकारने पुढाकार  घेतला. सर्वांची माहिती घेऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. या गोष्टींमधून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आज पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आजही अशा अनेक जिल्हे आहेत, तेथे हजारो तरुण बेरोजगार आहेत त्यांना हाताशी काही काम नाही आजही ते तरुण मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये येऊन काही काम मिळते का यासाठी प्रयत्नशील असतात. 

 सध्या कोरोनामुळे  कामगारांचे लोंढे आपल्या राज्यातुन महाराष्ट्राच्या बाहेर निघून जात आहेत. त्यामुळे  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. यासाठी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी पुढाकार घेत राज्यातील भूमिपुत्रांसाठी रोजगार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार ज्या परप्रांतीय मजुरांची नोंद घेत आहेत, ज्यामध्ये ते कुठे काम करत होते. कोणत्या प्रकारचे काम करत होते त्यांची त्या विभागात संख्या किती होती अशाप्रकारे महत्त्वाची माहिती घेऊन ती आपल्या रोजगार विभागाला द्यावी आणि जे तरुण त्यासंदर्भातील कामांमध्ये तरबेज आहेत किंवा त्या प्रकारचे काम करू इच्छितात त्या तरुणांना यापुढे सदरचे प्रशिक्षण देऊन ज्या ठिकाणाहून परप्रांतीय मजुरांनी स्थलांतर केले आहे त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी महत्वाची मागणी प्रितम म्हात्रे यानी केलेली आहे.  तसेच ज्या कंपन्यांमधून परप्रांतीय मजुरांनी महाराष्ट्र कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये असताना स्थलांतर केले आहे. त्या कंपन्यांनासुद्धा महाराष्ट्र पूर्वपदावर आल्यावर त्या कामगारांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमधील तरुणांना नोकरी नाही त्या तरुणाचा डाटा आपल्या रोजगार विभागातर्फे त्या संबंधित कंपन्यांना देण्यात यावा. या संदर्भातील आपण सखोल पणे विचार करून एखादी रोजगार समिती स्थापन करावी जेणेकरून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना महाराष्ट्रातच रोजगार मिळण्याची नवीन संधी उपलब्ध होईल. अशाप्रकारे ठोस पावले उचलावी अशी मागणी पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.