पेण तालुक्यातील समस्या तातडीने सोडवाव्यात, मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या वतीने निवेदन 

पेण तालुका मुलभूत अधिकार संघर्ष समिती व जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज तहसिल कार्यालय येथे विविध समस्यांबाबत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते.त्या अनुषंगाने तहसिल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

पेण : देशात कोरोना व्हायरसने हाहाकार उडविला आहे. पेण तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने मात्र पेणमध्ये कोविड बाबतची तुटपुंजी आरोग्यव्यवस्था असल्याने रुग्णांचे हाल मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या तातडीने सोडविण्यात याव्यात यासाठी मुलभूत अधिकार संघर्ष समितीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

पेण तालुका मुलभूत अधिकार संघर्ष समिती व जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज तहसिल कार्यालय येथे विविध समस्यांबाबत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते.त्या अनुषंगाने तहसिल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पेण नायब तहसीलदार धनंजय कांबळे, सुनिल जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.गवळी, गिरकर, पंचायत समिती अधिकारी, एमएसइबी अधिकारी यांच्यासह,नंदा म्हात्रे, मोहिनी गोरे, राजन झेमसे,संदिप रेणुका पाटील, रामदास पाटील, विवेक कोरडे, अशोक मोकल , राजाराम ठाकुर,  हीदु कुवारे अदि या बैठकीत उपस्थित होते.

या बैठकीत पेण तालुक्यातील कोविड -१९ महामारीच्या काळातही सरकारी दवाखान्यात केसपेपरचे दहा रूपये घेतले जातात तरी कोविड आपत्तीच्या काळात केसपेपर विनामूल्य देण्यात यावा, एस टी बसेस बंद असल्याने ग्रामिण भागातील रूग्णांना उपचाराकर्ता शहरात येण शक्य होत नाही तरी त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था शासनाने करावी,१००० लोकसंख्येमागे एक बेड ह्या निकषानुसार पेणच्या २ लाख लोकसंख्येकरीता २०० बेडचे मंजूरीचा प्रस्ताव आरोग्यविभागाकडे पाठवावा व मंजूर व्हावा,

कोविड रूग्णांनाना एम्ब्युसन्स, वेंटिलेटर बेड आँक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याकर्ता सुरू केलेल्या कंट्रोलरूमचे संपर्क क्रमांक असलेले माहितीदर्शक फलक उपजिल्हारूग्णालय पेण, प्रार्थमिक आरोग्य केंद्र नगरपालिका, ग्रामपंचायत येथील दर्शनीय ठिकाणी लावण्यात यावे, पेण उपजिल्हा रूग्णालयास शासनाने दिलेल्या दोन वेंटिलेटरची जोडणी करून घ्यावी,

पेण उपजिल्हारूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, तालुक्यातील सर्व प्रार्थमिक आरोग्यकेंद्रात आक्सिजन बेडची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य यंत्रणा ह्याच्या जबाबदार्या ठरवून सदर मार्गदर्शिका ,गाईडलाईन जनतेच्या माहितीकर्ता प्रसिध्द करावी

चुकीची व वाढिव वीजबील देवून ग्राहकांना मनस्ताप देणार्या विजवितरण विभागाच्या कारभाराकडे लक्ष देण्यात यावे अशा विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली असून या समस्या लवकरात सोडविण्यात येतील असे नायब तहसीलदार यांनी सांगितले.