रायगड जिल्ह्यात कोरोनाचे आज १०१ नवीन रुग्ण, ३ मृत्यू तर ४४ जणांची कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १०१ नवीन रुग्ण सापडले आहेत . माणगावमधील दोन महिला डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. आज तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ४४ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १०१ नवीन रुग्ण सापडले आहेत . माणगावमधील दोन महिला डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. आज तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ४४ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ६५,  पनवेल ग्रामीणमध्ये २०, उरण ७, अलिबाग ६ आणि पेणमध्ये ३ रुग्ण सापडले  आहे. आज पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २१६८ झाली असून जिल्ह्यात ९४  जणांचा मृत्यू झाला आहे.                
  रायगड जिल्ह्यात आज १०१  नवीन रुग्ण सापडले असून ४४  जणांनी कोरोनावर मात केली आहे .पनवेल तालुक्यात ८५  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ६५ नवीन रुग्ण सापडले आहेत.  कळंबोली खेडूकपाडा येथील २५ वर्षीय व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आदई येथील एका आणि उरणमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
 पनवेल ग्रामीणमध्ये २०, माणगाव ५, पेण ४, उरण ३, अलिबाग १,  खालापूर २ आणि  कर्जतमध्ये १ रुग्ण सापडला आहे. माणगावमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या दोन महिला डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे .  रायगड जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ६१०४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २१६८  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ७ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १४९५  जणांनी मात केली असून ५७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.