आज पनवेल तालुक्यात ३९, उरण तालुक्यात २७ नवीन रुग्ण सापडल्याने रायगडमध्ये ३१६ कोरोना रुग्ण

पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये ३९ नवीन रुग्ण सापडले असून ९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरी गेले आहेत.आज खांदा कॉलनीत ८ , कामोठे ६, रोडपाली ४ खारघर आणि कळंबोलीत प्रत्येकी ३

पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये ३९  नवीन रुग्ण सापडले असून ९  रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरी गेले आहेत.आज खांदा कॉलनीत ८ , कामोठे ६, रोडपाली ४  खारघर आणि कळंबोलीत प्रत्येकी ३  रुग्ण सापडले आहेत. महापालिका क्षेत्रात २४ नवीन रुग्ण सापडले आहे .ग्रामीणमध्ये करंजाडे आणि उलवेमध्ये प्रत्येकी  ६ रुग्ण सापडले असून सुकापुर २ आणि ऊयासारलीमध्ये १ रुग्ण असे एकूण १५ रुग्ण सापडले आहेत. महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या १८०  झाली आहे. तालुक्यात कोरोनाचे २४३  रुग्ण झाले आहेत . उरण तालुक्यात नवीन २७ रुग्ण सापडल्याने रायगड जिल्ह्यात  कोरोनाचे ३१६ रुग्ण झाले असून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

  पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे मध्ये सेक्टर ३५ मध्ये संकल्प सोसायटीत २ महिला , सेक्टर ११ मध्ये आशियाणा कॉम्प्लेक्समध्ये २ कोरोनाबाधित सापडले असून त्यांच्या घरातील कुटुंब प्रमुखांना या आधीच कोरोंनाची बाधा झाली आहे. सेक्टर १७ रिध्दी सिध्दी दर्शनमधील गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि सेक्टर ५ मधील मारुति टॉवरमध्ये राहणारे नागपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे. खारघरमध्ये सेक्टर ११ मधील फ्रेंड सोसायटीतील पूर्वी कोरोनाची बाधा झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या घरातील २ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. खरघर सेक्टर १६ वास्तुविहारमधील एका बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.  खांदा कॉलनीतील सेक्टर ७ मधील श्रीजी संघा सोसायटी आणि सेक्टर ७ मधील सागरदीप सोसायटीतील प्रत्येकी ४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्या घरातील व्यक्तीला पूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. कळंबोली सेक्टर ३ ई – के एल -५ मधील दोन कुटुंबातील 3 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्या घरातील आणि शेजारच्यांना यापूर्वी कोरोनाची बाधा झालेली आहे . रोडपाली सेक्टर १० कुबेर पॅलेसमध्ये राहणार्‍या चेंबुर पोलीस ठाण्यातील उप निरीक्षकांच्या कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे . त्यांना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे.  सोमवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १५०५  जणांची कोरोनाची  टेस्ट केली आहे. त्यापैकी ३८ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ९५ जणांवर उपचार सुरू असून ७८  रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज कोरोनाचे ९ रुग्ण बरे झाल्याने त्यान घरी पाठवण्यात आले आहे. 

पनवेल ग्रामीण मध्ये सोमवारी  करंजाडेमधील एकाच कुटुंबातील ४ जणांसह ६ जणांना तर उलवेमधील एकाच कुटुंबातील ५ जणांसह ६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  सुकापूरमध्ये २ तर उसर्लीत एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाचे ६३ रुग्ण झाले असून ८ जण बरे झाले आहेत   रायगड जिल्ह्यात आज  उरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा येथील कोरोना पॉझिटीव्ह मच्छिमारामुळे लागण झालेल्या २१ जणांच्या संपर्कातील आणखी २७ जणांची कोरोना टेस्ट आज  पॉझिटीव्ह आली आल्यामुळे  उरण तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. यामध्ये एका करंजातील ४९ जणांचा समावेश आहे. कोरोनाबाधित ५ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.