रायगड जिल्ह्यात कोरोनाचे २० नवीन रुग्ण, २ बळी –  रुग्णांची संख्या ३३६ वर

पनवेल : पनवेल ग्रामीणमध्ये ४ नवीन रुग्ण सापडले असून एक बळी गेला आहे. महापालिका क्षेत्रात ९ नवीन रुग्ण सापडले असून ८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरी गेले आहेत. आजच्या

पनवेल : पनवेल ग्रामीणमध्ये ४  नवीन रुग्ण सापडले असून एक बळी गेला आहे. महापालिका क्षेत्रात ९ नवीन रुग्ण सापडले असून  ८  रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरी गेले आहेत. आजच्या रुग्णांमध्ये ९ महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे. आज कामोठे ४, खारघर ३ नवीन पनवेल आणि पनवेल मध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. महापालिका क्षेत्रात ९ नवीन रुग्ण सापडले आहेत.

 पनवेल ग्रामीणमध्ये  उलवे २, कोन आणि विचुंबे मध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले असून विचुंबे येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या १८९ झाली आहे. तालुक्यात कोरोनाचे २५६ रुग्ण झाले आहेत तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात आज पनवेल,उरण, कर्जत  आणि तळा तालुक्यात नवीन रुग्ण सापडले असून जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३३६  झाली असून १२  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे       

 पनवेल ग्रामीण मध्ये आज उलवे २, कोन आणि विचुंबे मध्ये प्रत्येकी १ असे ४ रुग्ण सापडले असून विचुंबे येथील वृध्द महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे. आतापर्यंंत ग्रामीण मध्ये कोरोनाचे ६७  रुग्ण झाले असून ८ जण बरे झाले आहेत रायगड जिल्ह्यात आज उरण तालुक्यातील  करंजा सुरकीचा पाडा येथील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.तळा तालुक्यातील  तळेगाव येथील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो धारावीतून गावाला गेला होता. कर्जत येथे ही नवीन रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची  संख्या ३३६  झाली आहे. रायगडमध्ये आज पनवेल ग्रामीण आणि कर्जत येथील प्रत्येकी एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.