आज उरणमध्ये ४४ तर पनवेलमध्ये १७ नवे रुग्ण आढळल्यानंतर रायगड जिल्ह्यात ३९७ कोरोना रुग्ण

पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये ७ नवीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये नेरे येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात १० नवीन रुग्ण सापडले असून २ रुग्णांनी कोरोनावर मात

पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये ७ नवीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये  नेरे येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात १० नवीन रुग्ण सापडले असून २ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने ते घरी गेले आहेत. आजच्या रुग्णांमध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि नवीन पनवेलमधील वकिलाचा समावेश आहे. आज कामोठे ५ , खारघर ३ नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी मध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या १९९ झाली आहे  तर तालुक्यात कोरोनाचे २७३ रुग्ण झाले आहेत तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रायगड जिल्ह्यात आज उरणमध्ये ४४  आणि पनवेल तालुक्यात १७ नवीन रुग्ण सापडले असून जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३९७ झाली असून १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे   

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे दिवसभरात ६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात उरणमध्‍ये एकाच दिवशी ४४ नवे रूग्‍ण सापडले आहेत. उरणने शंभरी पार केली असून आतापर्यंत उरणमध्ये १०५ झाले असून सलग ४ दिवसात ९७ रुग्णांची नोंद झाली आहे.पनवेल तालुक्यात १७ रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्‍हयातील कोरोनाबाधितांची संख्‍या आता ३९७ झाली आहे.