पेणमध्ये कोरोनाचा शिरकाव, रायगड जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण सापडल्याने संख्या पोहोचली ४२८ वर

पनवेल : रायगड जिल्ह्यात ३१ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यातील सुकापुर येथील एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. पेणमध्ये आज पहिला रुग्ण सापडला असून महाड १,

 पनवेल :  रायगड जिल्ह्यात ३१ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यातील  सुकापुर येथील एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. पेणमध्ये आज पहिला रुग्ण सापडला असून महाड १, खालापूरमध्ये २ नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यामध्ये २७  नवीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये  विचुंबे  येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे.तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .महापालिका क्षेत्रात २०  नवीन रुग्ण सापडले असून ८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात  कामोठे ८ , खारघर ८, कळंबोली ३ आणि  नवीन पनवेलमध्ये १ रुग्ण सापडला आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या २१९  झाली आहे  तर तालुक्यात कोरोनाचे ३००  रुग्ण झाले असून  ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४२८ रुग्ण झाले असून १२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात आज पनवेल  तालुक्यात २७ नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये एका नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. तिला कोकरे येथील रुग्णाच्या संपर्कामुळे संसर्ग झाला आहे. पेण तालुक्यात पहिला रुग्ण वडखळ येथे सापडला आहे . रायगडमध्ये एकूण रुग्ण ४२८ झाले असून १२७  जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २८६ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १७९० रूणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.