रायगडमध्ये २ कोरोनाबाधितांचा मृत्यू, ३२ रुग्णांची भर – जिल्ह्याची संख्या ४५९

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १५, पनवेल ग्रामीण १२, उरण ३ तसेच मुरुड आणि अलिबागमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला असून अलिबाग आणि खालापूरमध्ये कोरोनामुळे

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १५, पनवेल ग्रामीण १२, उरण ३ तसेच मुरुड आणि अलिबागमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला असून अलिबाग आणि खालापूरमध्ये कोरोनामुळे आज दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या २३४ झाली आहे  तर पनवेल तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे ३२४ रुग्ण झाले असून १०  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात आता कोरोनाचे ४५९ रुग्ण झाले असून १३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला  आहे.

 रायगड जिल्ह्यात आज पनवेल  तालुक्यात २७ नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे   पनवेल मध्ये कामोठे येथील ८, खारघर ३, कळंबोली २ , खांदा कॉलनी आणि पनवेलमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात २३४ रुग्ण झाले असून १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीण मध्ये १२ रुग्ण आहेत त्यापैकी सुकापुर आणि करंजाडी  येथील दोन कुटुंबातील प्रत्येकी ४ व्यक्तींचा समावेश आहे . त्यामुळे तालुक्यात ३२४ रुग्ण झाले आहेत. पनवेल तहसीदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडील अहवालात पनवेल ग्रामीणच्या रुग्णांची संख्या वेगवेगळी दाखवण्यात आली आहे.  

 पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथे ८ रुग्ण सापडले आहेत त्यापैकी संकल्प सोसायटीत एकाच घरात २ रुग्ण सापडले आहेत. कामोठेमधील रुग्णात पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा समावेश आहे . एक बँक ऑफ इंडियाच्या माजगाव शाखेतील लिपिकाचा समावेश आहे कळंबोलीतील एक  रुग्ण  धारावीतून पाहुणा आला होता, तर एका महिलेला पती  पासून संसर्ग झाला आहे. खारघरमधील ३ रुग्ण हे मुंबईशी संबंधित आहेत . खांदा कॉलनीमधील १ रुग्ण मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील महिलेला कोरोनाची बाधा झाली असून या पोलीस ठाण्यातील दुसरा रुग्ण असल्याने पोलीस ठाण्यात आज निर्जंतुकीकरण करण्यात आले. पनवेल ग्रामीणमध्ये आज १२ नवीन रुग्ण सापडले असून त्यापैकी  ( पाली देवद )  सुकापुर आणि करंजाडी  येथील एकाच घरातील प्रत्येकी ४ रुग्ण आहेत. एक रुग्ण उलवे  येथील आहे पनवेल ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या ९३  झाली असून तालुक्यात कोरोनाचे ३२४  रुग्ण झाले आहेत. १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.