रायगड जिल्ह्यात आज वाढले २२ कोरोना रुग्ण – जिल्ह्यात ४८१ कोरोनाबाधित

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १२, पनवेल ग्रामीण ८, उरण आणि माणगावमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ४८१

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १२,  पनवेल ग्रामीण ८,  उरण आणि माणगावमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ४८१ झाले असून १५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला  आहे.

 रायगड जिल्ह्यात आज  माणगाव तालुक्यात कुशेडे येथे पहिला कोरोना रुग्ण सापडला असून तो मुंबईहून गावाला गेला होता. उरण तालुक्यातही एक रुग्ण सापडला आहे.  पनवेल तालुक्यात २०  नवीन रुग्ण सापडले असून १७ जणांनी कोरोनावर मात केली आहे . महापालिका क्षेत्रात १२ रुग्ण सापडले. यामध्ये कामोठे येथील ७, खारघर २,  कळंबोली २ आणि तळोजातील १ रुग्णाचा समावेश आहे त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात २४६  रुग्ण झाले असून ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीण मध्ये ८ नवीन रुग्ण सापडले असून १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आहेत  कोन येथील एकाच कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पनवेल  तालुक्यात ३४४ रुग्ण झाले आहेत.  आतापर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १८०० टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २४६ पॉझिटिव्ह असून ८० टेस्टचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आजपर्यंत १२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १२२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात ७ जणांचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  रायगड जिल्ह्यात आतापर्यंत १९६३ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यापैकी ८१ जणांचे रिपोर्ट बाकी असून ४८१ रुग्णांपैकी ३०६ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात आजपर्यंत झालेले रुग्ण –  कामोठे -९९  , खारघर- ५७, कळंबोली- २७, नवीन पनवेल -३१ , पनवेल-१८ , सी.आय.एस.एफ- १०, तळोजा- ४ असे एकूण २४६