रायगड जिल्ह्यात २८ नवीन कोरोना रुग्ण, पनवेलमध्ये दोघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २८ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १२, पनवेल ग्रामीण ७, माणगाव ५, उरण २, कर्जत आणि अलिबागमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले आहेत. पनवेल

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २८  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल  महापालिका क्षेत्रात १२, पनवेल ग्रामीण ७, माणगाव ५, उरण २, कर्जत आणि अलिबागमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडले  आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली आणि विचुंबे मध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ५४६ रुग्ण झाले असून १८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला  आहे.

रायगड जिल्ह्यात आज पनवेल तालुक्यात १९  नवीन रुग्ण सापडले असून १०  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला  असून १२ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात २७१ रुग्ण झाले असून १२५  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीण मध्ये ९  नवीन रुग्ण सापडले आहेत. पाली देवद  ( सुकापूर ) येथील एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह एका व्यक्तिला कोरोंनाची लागण झाली आहे. पनवेल  तालुक्यात ३८५  रुग्ण झाले आहेत.१३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  उरण तालुक्यात २  नवीन  रुग्ण सापडले  आहेत. उरण तालुक्यात  सुरकीचा पाडा आणि पागोटे येथे प्रत्येकी  १ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

 माणगाव तालुक्यात कुशेडे येथील ५ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तिसोबत हे मुंबईहून गावाला आले होते. आज अलिबाग आणि  कर्जत येथे ही एक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत  २१५०  टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी  ५४६  जणांचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ८५ जणांचा अहवाल मिळालेला नाही . आजपर्यंत १८१ रुग्ण  बरे झाल्याने घरी गेले आहेत. ३४५ रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.