रायगड जिल्ह्यात ३३ नवीन रुग्ण, कोरोनामुळे पनवेलमध्ये २ तर कर्जतमध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३३ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यात २५, उरण ४ , कर्जत, खालापूर आणि महाडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पनवेलमध्ये दोघांचा आणि कर्जतमध्ये एका व्यक्तीचा

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३३ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यात २५,  उरण ४ , कर्जत, खालापूर आणि महाडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पनवेलमध्ये दोघांचा आणि कर्जतमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे आता ६२३  रुग्ण झाले असून २७०  जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

रायगड  जिल्ह्यात  उरण तालुक्यात सुरकीचा पाडा येथे २ करंजा आणि नवीन न्हावाशेवा येथे प्रत्येकी १ व्यक्तीला कोरोनाची लागणा झाली आहे . खालापूर , महाड आणि कर्जत मध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला आसून कर्जतमध्ये एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे  जिल्ह्यात गुरुवारपर्यंत  २३८२  टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी ६२३  जणांचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ७३ जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत २७० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तसेच ३२७  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे