रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ३० नवीन रुग्ण, चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३० नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यात २० उरण २ अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येकी ३, मुरुड आणि म्हसळ्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३० नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यात २०  उरण २ अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येकी ३,  मुरुड आणि म्हसळ्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. श्रीवर्धनमध्ये २ , पनवेल आणि म्हसळा तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ६५३  रुग्ण झाले असून ३१७  जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ३०  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 पनवेल ग्रामीणमध्ये आज ६  नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आसून ११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज देवद ( सुकापुर ) २ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कसालखंड, चिखले, नेरे आणि विचुंबे येथे प्रत्येकी १ नवीन रुग्ण सापडला आहे. महापालिका क्षेत्रात कामोठे ६ , नवीन पनवेल ४, खारघर २ , कळंबोली आणि रोडपाली  प्रत्येकी १  असे १४  नवीन रुग्ण सापडले असून १५  व्यक्तींनी  कोरोनावर मात केली आहे. आज एका  महिलेचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यात आत पर्यंत कोरोनाचे ४६६  रुग्ण सापडले असून १८  जणांचा मृत्यू झाला  आहे . उरण तालुक्यात कारंजा आणि नागाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.  
 रायगड  जिल्ह्यात  जिल्ह्यात अलिबाग आणि श्रीवर्धनमध्ये  प्रत्येकी ३ तर  मुरुड आणि म्हसळ्यात  प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे. श्रीवर्धन २ , पनवेल आणि म्हसळा प्रत्येकी एका  व्यक्तीचा मृत्यू  झाला. आजपर्यंत २४६५  टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी ६५३  जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ७० जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत ३१७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तसेच ३०६  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३०  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.