रायगड जिल्ह्यात आज कोरोनाच्या ५४ नवीन रुग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५४ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यात २७, माणगाव १४, रोहा ५, पोलादपूर ३, मुरुड २, तळा , पेण आणि उरण तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडले

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज  ५४  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल तालुक्यात २७, माणगाव १४, रोहा ५, पोलादपूर ३, मुरुड २, तळा , पेण आणि  उरण  तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत.  पनवेल ग्रामीण २ आणि महापलिका क्षेत्रात एका  व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ७०७  रुग्ण झाले असून ३७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये आज ८  नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर १० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज पाली देवद ( सुकापुर ) आणि उमरोली येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. चिपळे येथील एकाच घरातील दोघांना कोरोंनाची लागण झाली आहे महापालिका क्षेत्रात कामोठे १०,खारघर ३,कळंबोली ४ नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी प्रत्येकी १ असे ११९ नवीन रुग्ण सापडले असून १४ व्यक्तींनी  कोरोनावर मात केली आहे. आज कामोठ्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे ४९३  रुग्ण सापडले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे.  

रायगड  जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांना कोरोनाचा संसर्ग  झाला आहे. माणगावमध्ये आज १४ रुग्ण सापडले असून हे रुग्ण मुंबईकर आहेत.  रोहा ५ , पोलादपूर ३,  मुरुड २,   तळा , पेण आणि  उरण  तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे. आजपर्यंत रायगड जिल्ह्यात २५१९   टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी ७०७ जणांचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ७०  जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत ३७३  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तसेच ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.