रायगड जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ४९ वर

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. आज जिल्ह्यात ५ रुग्ण सापडले असून, रायगड जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ४९ रुग्ण सापडले आहेत. तर पोलादपूरमधील

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. आज जिल्ह्यात ५ रुग्ण सापडले असून, रायगड  जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ४९ रुग्ण सापडले आहेत. तर पोलादपूरमधील कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनोमुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सापडलेल्या ५ रूग्णांपैकी ४ रुग्ण श्रीवर्धन तालुक्यातील तर १ रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे.रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग ठिकठिकाणी पसरू लागला आहे. सुरुवातीला पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले होते, मात्र त्यानंतर पनवेल ग्रामीण, उरण, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असून, नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच लागू केलेले निर्बंध पाळण्याची गरज आहे.

सर्वत्र कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. कोरोना विषाणू वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र नागरिक सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच निर्बंध पाळत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ४९ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५ रुग्णांची प्रकृती ठिकठाक झाली असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ४२ रुग्ण आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची पत्नी आणि तीन मुले यांची कोव्हिड-१९ टेस्ट रविवारी पॉझिटीव्ह आली आहे. तर तपासणीसाठी पाठविलेल्या अन्य २४ जण यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. शुक्रवारी भोस्ते गावात कोरोना रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. ही व्यक्ती मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरळीहून आली होती. त्यामुळे तातडीने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना तपासणीसाठी पनवेल येथील ग्रामविकास भवन येथे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्याची पत्नी, तीन मुले, एक खाजगी डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबचे कर्मचारी, रिक्षा चालक, मित्र आणि नातेवाईक आदींचा समावेश होता. यापैकी पत्नी व मुले अशा आणखी चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.