रायगड जिल्ह्यात आज ५० नवीन कोरोनाबाधितांची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५० नवीन रुग्ण सापडले. यामध्ये पनवेल महापालिका २०, पनवेल ग्रामीण ९ , माणगाव ५, उरण १० , कर्जत ३, अलिबाग २ आणि पोलादपूर तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. रायगड

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५० नवीन रुग्ण सापडले. यामध्ये पनवेल महापालिका २०, पनवेल ग्रामीण ९ , माणगाव ५, उरण १० , कर्जत ३, अलिबाग २ आणि  पोलादपूर  तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ७५७  रुग्ण झाले असून ४०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माणगावमध्ये आज ५  रुग्ण सापडले असून हे रुग्ण मुंबईकर आहेत. उरण तालुक्यात १०, अलिबाग २, कर्जत ३, पोलादपूर तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. आजपर्यंत रायगड जिल्ह्यात २६६४ टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी ७५७  जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ९६  जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत ४०८  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तसेच ३१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३३  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे