रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ४४ नवीन रुग्ण, ३५ रुग्णांची कोरोनावर मात, २ मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४४ नवीन रुग्ण सापडले. यामध्ये पनवेल महापालिका २२, पनवेल ग्रामीण ११, माणगाव २, तळा ३, कर्जत २, खालापूर २, अलिबाग १ आणि सुधागड तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे.

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४४ नवीन रुग्ण सापडले. यामध्ये पनवेल महापालिका २२, पनवेल ग्रामीण ११, माणगाव २, तळा ३, कर्जत २, खालापूर २, अलिबाग १ आणि सुधागड  तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ८००१ रुग्ण झाले असून ४६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आज तळा तालुक्यात ३, खालापूर , कर्जत आणि माणगावमध्ये प्रत्येकी २ तर अलिबागमध्ये एक रुग्ण सापडला आहे . आजपर्यंत  रायगड जिल्ह्यात २८१८  टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी ८०१  जणांचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ९७ जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत ४६३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. ३०३  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३५  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.