रायगड जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग, आज ३९ नवे कोरोनाबाधित

पनवेल : रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आलेल्या चाकरमान्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे ग्रामीण भागात भीती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात ३९

 पनवेल : रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आलेल्या चाकरमान्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे ग्रामीण भागात भीती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात ३९  नवीन रुग्ण सापडले. यामध्ये पनवेल ९ ,अलिबाग ९ , रोहा ८,  माणगाव ३  रुग्णांचा  समावेश आहे. आज अलिबाग आणि मुरुड तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा आज  मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे आता ८४० रुग्ण झाले असून ४८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आजपर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 पनवेल आणि  अलिबागमध्ये प्रत्येकी ९,  रोहा ८ ,माणगाव ३ , खालापूर , मुरुड, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यात प्रत्येकी २ तर पेण आणि तळा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला असून आज अलिबाग आणि मुरुडमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात आजपर्यंत ३४ तर अलिबाग २०, कर्जत ११, रोहा १३, आणि श्रीवर्धनमध्ये १०  रुग्ण झाले आहेत. मंगळवारपर्यंत रायगड जिल्ह्यात ३०४१  टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी ८४०  जणांचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ७३ जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत ४८२ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तसेेच ३२१  रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आलेले चाकरमानी अनेक गावात शासनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याने ग्रामीण भागात संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती  स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे