रायगड जिल्ह्यात ९०० कोरोनाबाधित – ५०५ जणांनी केली कोरोनावर मात

पनवेल :रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९०० असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागात मुंबई, पुणे आणि गुजरातमधून आलेल्या चाकरमान्यांच्यात

पनवेल :रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९०० असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागात मुंबई, पुणे आणि गुजरातमधून  आलेल्या चाकरमान्यांच्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. तो संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आज सांगितले आहे रायगड जिल्ह्यात आज ६० नवीन रुग्ण सापडले. यामध्ये पनवेल २३, अलिबाग ११, कर्जत ८, पोलादपूर ६ आणि म्हसळा व उरणच्या प्रत्येकी ५  रुग्णांचा समावेश आहे आज पनवेल तालुक्यात ३ तर म्हसळा तालुक्यात  एका रुग्णाचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ९००  रुग्ण झाले असून ५०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ४१  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आज पनवेल महानगर पालिका क्षेत्रात १८ तर ग्रामीणमध्ये ५ रुग्ण सापडले असून तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. अलिबाग ११, कर्जत ८, पोलादापूर ६ , म्हसळा ५,उरण ५ ,रोहा आणि श्रीवर्धन प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. म्हसळ्यामध्ये ही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत  रायगड जिल्ह्यात ३१०१   टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी ९०० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ७३ जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत ५०५  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत ३५४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.