रायगड जिल्ह्यात आज आढळले ५६ नवीन रुग्ण, संख्या पोहोचली ९५६ वर

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५६ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल मध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९५६ झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील ५८८ रुग्णांचा समावेश

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५६ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल मध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९५६ झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील ५८८ रुग्णांचा समावेश आहे. आज पनवेलमध्ये एका महिलेचा आणि पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या ४३ झाली आहे. 

रायगड जिल्ह्यात आज ५६  नवीन रुग्ण सापडले.  पनवेल तालुक्यात सर्वाधिक ४१ रुग्ण असून यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील २९ , ग्रामीण मध्ये १२ रुग्णांचा समावेश आहे.  मुरुड ५ , रोहा ३ ,पेण २ आणि कर्जत, अलिबाग, म्हसळा, माणगाव व तळा तालुक्यात प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला आहे. हे स्राव रुग्ण शहरातून गावाला गेलेल्या व्यक्ती आहेत. रायगड जिल्ह्यात ३२६६  टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी ९५६  जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ७०  जणांचा अहवाल मिळालेला नाही. आजपर्यंत ५३८  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तसेच ३७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.