रायगड जिल्ह्यात आज ५२ नवीन रुग्ण आढळल्याने आकडा हजाराच्या पार

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेलमध्ये तिघांचा आणि उरणमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर १७ जणांनी मात केली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेलमध्ये तिघांचा आणि उरणमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर १७ जणांनी मात केली आहे. रायगड  जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची संख्या १००८ झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील ६५६ रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या ४७ झाली आहे.  

रायगड जिल्ह्यात आज  कोरोनाचे ५२ नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनीतील कन्हैया अपार्टमेंटमधील ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिला क्षयरोग आणि लिव्हरचा विकार असल्याचे समजते.  पनवेल ग्रामीणमध्ये आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिखले येथील ७९ वर्षीय वृद्धासह उलव्यातील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधील २६ वर्षीय व्यक्तीचा त्यामध्ये समावेश आहे.  पनवेल तालुक्यात सर्वाधिक २८  रुग्ण असून यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील २५ , ग्रामीण मध्ये ३ रुग्णांचा समावेश आहे. कर्जत ७ , पेण ५ माणगाव ३ , म्हसळा ३, अलिबाग २ , महाड २, उरण  आणि  खालापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ३४३४ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १००८ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ६६ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ५५६ जणांनी मत केली असून ४०५ रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.