रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ४२ रुग्ण – ३३ जणांनी कोरोनावर केली मात, आकडा १०५० वर

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४२ नवीन रुग्ण सापडले असून कोरोनावर ३३ जणांनी मात केली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०५० झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४२ नवीन रुग्ण सापडले असून कोरोनावर ३३ जणांनी मात केली आहे. रायगड  जिल्ह्यात कोरोनाच्या  रुग्णांची संख्या १०५०   झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील ६८९ रुग्णांचा समावेश आहे  जिल्ह्यात मृतांची संख्या ४७ झाली आहे. रायगड जिल्ह्यात शनिवारी  कोरोनाचे ४२ नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात सर्वाधिक ३३ रुग्ण असून यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील २३ , ग्रामीण मधील १० रुग्णांचा समावेश आहे. अलिबाग ४ , माणगाव २ ,रोहा, उरण आणि खालापूर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत.

रायगड जिल्ह्यात शनिवारपर्यंत ३६५०  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १०५०  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच १७८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ५८९  जणांनी मत केली असून ४१४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.