रायगड जिल्ह्यात आज नवे २८ रुग्ण तर २५ जणांनी केली कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात २८ नवीन रुग्ण सापडले. आज पनवेल महापालिका क्षेत्रात १६, पनवेल ग्रामीणमध्ये ५, उरण ३, रोहा २ म्हसळा आणि महाडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. कोरोनावर आज २५

 पनवेल : रायगड जिल्ह्यात २८  नवीन रुग्ण सापडले. आज पनवेल महापालिका क्षेत्रात १६, पनवेल ग्रामीणमध्ये ५, उरण ३, रोहा २  म्हसळा आणि महाडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. कोरोनावर आज २५ जणांनी मात केली आहे. रायगड  जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११४५ झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील ७५० रुग्णांचा समावेश आहे  जिल्ह्यात मृतांची संख्या ५० आहे. 

रायगड जिल्ह्यात आज २८  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात सर्वाधिक २१  रुग्ण असून यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील १६ रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठ्याला ११ रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या २०९ झाली आहे. पनवेल  ग्रामीणमध्ये ५ नवीन रुग्ण सापडलेत. उरण  ३, रोहा २,म्हसळा  आणि महाडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत  ३९२०  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ११४५  पॉझिटिव्ह आल्या आहेत. १४९  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ६४१ जणांनी मात केली असून ४५४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ५०  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.