रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ३६ नवीन रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३६ नवीन रुग्ण सापडले. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २३ , पनवेल ग्रामीणमध्ये २, माणगाव ६, रोहा २ ,उरण, म्हसळा आणि सुधागडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पनवेल

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३६ नवीन रुग्ण सापडले. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २३ , पनवेल ग्रामीणमध्ये २, माणगाव ६,  रोहा २ ,उरण, म्हसळा आणि सुधागडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आज चौघांचा आणि कर्जतमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर आज ४४ जणांनी मात केली आहे. रायगड  जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११८०  झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील ७७५ रुग्णांचा समावेश आहे  जिल्ह्यात मृतांची संख्या ५५ आहे. रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ३६  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात २५ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २३ नवीन रुग्ण सापडले आहेत. कामोठे सेक्टर २१ त्रिशूल अपार्टमेंटमधील ६५ वर्षीय महिला . खारघर सेक्टर २ विघ्नहर्ता सोसायटीतीळ ४६ वर्षीय व्यक्ती , नवीन पनवेल ए टाईप मधील ६७ वर्षीय व्यक्ती आणि कळंबोली रोडपाळी येथील आदिवासी चाळीतील ४९ वर्षीय महिला यांचा आज मृत्यू झाला. त्यांना अगोदरच्या इतर व्याधी ही होत्या. कर्जत येथे ही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

याशिवाय माणगाव तालुक्यात ६ नवीन रुग्ण सापडले . रोहा २ ,म्हसळा, उरण आणि सुधागडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात आज  पर्यंत  ४००४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ११८०  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच १२५  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ६८५  जणांनी मात केली असून ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ५५  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.