रायगड जिल्ह्यात १४२ नवीन कोरोना रुग्ण ३ जणांचा मृत्यू – १०३ जणांनी केली कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १४२ नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ९५, पनवेल ग्रामीणमध्ये २७ ,

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १४२ नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०३  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ९५,  पनवेल ग्रामीणमध्ये २७ , उरण १० , खालापूर ४, रोहा ३ , कर्जत ,पेण आणि मुरुडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २७४६  झाली असून जिल्ह्यात ११३  जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे १४२ नवीन रुग्ण सापडले असून १०३  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १२२ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ९५  नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २ व्यक्तींचा आणि ग्रामीण मध्ये १ व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये २७ , उरण १० , खालापूर ४, रोहा ३ , कर्जत ,पेण आणि मुरुड  मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात बुधवारपर्यंत ७१९५  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २७४६ पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यात ४८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १८३९  जणांनी मात केली असून ७९४  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ११३  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.