रायगड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५२ वर, १५ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव

अलिबाग : आजरायगड जिल्ह्यात कोरोनाचे ३ रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ५२ रुग्ण सापडले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ५

 अलिबाग : आज रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ३ रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ५२ रुग्ण सापडले आहेत.  आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग शहरी भागात ग्रामीण भागातही वाढू लागला असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग ठिकठिकाणी पसरू लागला आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण आढळले होते, मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूची लागण झाल्याचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असून, नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच लागू केलेले निर्बंध पाळण्याची गरज आहे.
 
सर्वत्र कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. कोरोना विषाणू वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र नागरिक सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच निर्बंध पाळत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ५२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ९ रुग्णांची प्रकृती ठिकठाक झाली असून, २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 41 रुग्ण आहेत.
 
 
रायगड जिल्ह्यात असलेल्या १५ तालुक्यांपैकी आत्तापर्यंत ५ तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण सापडले आहेत. पनवेल, उरण, श्रीवर्धन, पोलादपूर, कर्जत या पाच तालुक्यात कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, महाड, सुधागड, खालापूर, माणगाव, रोहा तालुक्यात कोरोना रुग्ण नसल्याचे दिसून येते.

डॉक्टरच्या भावाला कोरोनाची लागण
 
कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणार्‍या डॉक्टरच्या भावाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रिपोर्ट येण्याच्या तीन दिवस आधी नेरळचे हे डॉक्टर भावाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करण्यात आले असून सर्व प्रकारचे लसीकरणही बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, मुरबाड येथे राहणार्‍या या डॉक्टरांची १९९ एप्रिल रोजी कोरोना टेस्ट घेण्यात आली असून त्याचे रिपोर्ट मंगळवारी येणार आहेत.