रायगड जिल्ह्यात १६० नवीन कोरोना रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १६० नवीन रुग्ण सापडले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८२ पनवेल ग्रामीणमध्ये ३६, उरण ७ ,

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १६० नवीन रुग्ण सापडले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८२ पनवेल ग्रामीणमध्ये ३६, उरण ७ , खालापूर ८, अलिबाग ९, कर्जत ७ ,पेण ४, माणगाव ३ ,श्रीवर्धन ३ आणि तळा तालुक्यात एक  रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २९०६  झाली असून जिल्ह्यात ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे १६० नवीन रुग्ण सापडले असून ४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ११८ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ८२  नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्र, खालापूर , श्रीवर्धन आणि महाडमध्ये प्रत्येकी १ व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ३६ , उरण ७, खालापूर ८ , अलिबाग ९ ,कर्जत ७ ,पेण ४, माणगाव ३ ,श्रीवर्धन ३ आणि तळा येथे एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ७४४१  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २९०६  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ३६ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १८८७  जणांनी मात केली असून ९०२  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ११७  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.