रायगड जिल्ह्यात १७० नवीन कोरोना रुग्ण ३ जणांचा मृत्यू –  ६६ रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १७० नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८७, पनवेल ग्रामीणमध्ये २९ ,पेण १६, खालापूर ८ ,

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १७० नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८७, पनवेल ग्रामीणमध्ये २९ ,पेण १६, खालापूर ८ , अलिबाग, रोहा, उरण  आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी ६ , कर्जत आणि मुरुडमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३०७६  झाली असून जिल्ह्यात १२० जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवीन रुग्ण सापडले असून ६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे .पनवेल तालुक्यात ११६ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ८७ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल  सेक्टर ४ मधील पुष्पांजली अपार्टमेंटमधील ६६ वर्षीय व्यक्तीचा,  नेरे येथील ३५ वर्षीय व्यक्ती आणि विचुंबे येथील ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे

 पनवेल ग्रामीणमध्ये २९ , पेण १६ , खालापूर ८ , अलिबाग, रोहा, उरण  आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी ६ , कर्जत आणि मुरुडमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ७६८२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३०७६  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ३१  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १९८३  जणांनी मात केली असून १००३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १२०  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.