रायगड जिल्ह्यात २०१ नवीन कोरोनाचे रुग्ण, ५ जणांचा मृत्यू – ६९ रुग्णाची कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज कोरोना रूग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज २०१ नवीन रुग्ण सापडले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज कोरोना रूग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज २०१ नवीन रुग्ण सापडले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८८, पनवेल ग्रामीणमध्ये ३१, कर्जत २२, उरण १५ , रोहा १५, माणगाव ८ ,अलिबाग ८, खालापूर ७,  पेण ४  ,पोलादापूर ,श्रीवर्धन आणि मुरुडमध्ये एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३२७७  झाली असून जिल्ह्यात १२५  जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २०१ नवीन रुग्ण सापडले असून ६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे . रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येचा हा  उच्चांक आहे. त्यामुळे रोहा आणि  माणगाव मध्ये पुढील आठवड्यात पुन्हा नागरिक स्वयंस्फुर्तीने बंद पाळणार आहेत.  पनवेल तालुक्यात ११९  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ८८ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३,  उरण  आणि माणगावमध्ये प्रत्येकी १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ३१ ,कर्जत २२,  उरण १५  , रोहा १५ , माणगाव ८ ,अलिबाग ८, खालापूर ७ , पेण ४ , पोलादापूर ,श्रीवर्धन  आणि मुरुड मध्ये एक  रुग्ण सापडला आहे.  रायगड जिल्ह्यात  आजपर्यंत ७९१८  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३२७७ पॉझिटिव्ह आल्या आहेत . ३८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २०२२  जणांनी मात केली असून ११३०  रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १२५  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.