रायगड जिल्ह्यात २३४ नवीन कोरोना रुग्ण, ५ जणांचा  मृत्यू तर  ११३ रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २३४ नवीन रुग्ण सापडले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ११३ पनवेल ग्रामीणमध्ये ५० , माणगाव

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २३४ नवीन रुग्ण सापडले असून ५  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ११३  पनवेल ग्रामीणमध्ये ५० , माणगाव ११, पेण ९ , खालापूर ७,उरण ५ ,  कर्जत ५ , अलिबाग ४ , रोहा ४ , पोलादापूर २  ,श्रीवर्धन २ ,मुरुड २,  महाड  आणि तळा मध्ये एक  रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या ३६८३  झाली असून जिल्ह्यात  ५ जणांचा मृत्यू झाला आहे.                

रायगड जिल्ह्यात सोमवारी कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे  कोरोनाचे २३४  नवीन रुग्ण सापडले असून ११३  जणांनी कोरोंनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १८१ रुग्ण हे  आजपर्यंतचे  सर्वात जास्त रुग्ण  आहेत . आज १८१  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १३१ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात  पनवेल , कळंबोली , नवीन पनवेल आणि कामोठे येथे प्रत्येकी एक अशा  ४ जणांचा  आणि  उरण तालुक्यात म्हातवली मध्ये एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .
     
पनवेल ग्रामीणमध्ये ५० , माणगाव ११, पेण ९ , खालापूर ७,उरण ५ ,  कर्जत ५ , अलिबाग ४ , रोहा ४ , पोलादापूर २ ,  श्रीवर्धन २ ,मुरुड २,  महाड  आणि तळा येथे
एक रुग्ण सापडला आहे  रायगड जिल्ह्यात सोमवारपर्यंत ८७१६  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३६८३ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच २८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २१९५  जणांनी मात केली असून १३५५  रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १३३  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.