रायगड जिल्ह्यात २६३ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू तर १४२ रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २६३ नवीन रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १४२ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात १२७, पनवेल ग्रामीणमध्ये ५४ ,अलिबाग

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २६३ नवीन रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १४२ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात १२७,  पनवेल ग्रामीणमध्ये ५४  ,अलिबाग २३,खालापूर २१, रोहा १६, उरण १२ , महाड ६, कर्जत ३ आणि मुरुडमध्ये एक रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या ३९४६ झाली असून जिल्ह्यात १३४ जणांचा मृत्यू झाला आहे.                

 रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २६३  नवीन रुग्ण सापडले असून १४२  जणांनी कोरोंनावर मात केली आहे. पनवेल तालुक्यात १८१ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १२७ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

 पनवेल ग्रामीणमध्ये ५४  ,अलिबाग २३ ,खालापूर २१, रोहा १६,   उरण १२ , महाड ६,  कर्जत ३ आणि मुरुडमध्ये एक रुग्ण सापडला आहे.  रायगड जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ९३१६ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३९४६ पॉझिटिव्ह आल्या आहेत. १८३ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २३३७  जणांनी मात केली असून १४७५ रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.