रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ११० वर

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे १३ रुग्ण आज सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ११० रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये

 अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे १३ रुग्ण आज सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ११० रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील १२ व पनवेल ग्रामीण मधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर पोलादपूर येथील एका रुग्णाची तब्बेत ठीक झाली आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग ठिकठिकाणी पसरू लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यात सोमवारी ३, मंगळवारी ३, बुधवारी ११ तर गुरुवारी ६ तर शुक्रवारी १३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येते. यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असून, नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच लागू केलेले निर्बंध पाळण्याची गरज आहे.
 
रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत ११० रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल २, महाड १, पोलादपूर-१  रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ६३ रुग्ण असून, यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५१, पनवेल ग्रामीण ७, उरण १, श्रीवर्धन १, कर्जत १, खालापूर १, महाड १ रुग्णाचा समावेश आहे.