रायगड जिल्ह्यामध्ये ६ नवे कोरोनाबाधित, कोरोना रुग्णांची संख्या ३८ वर

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. आज जिल्ह्यात ६ नवे रुग्ण सापडले असून, रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ३८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. आज जिल्ह्यात ६ नवे रुग्ण सापडले असून, रायगड  जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ३८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४ रुग्णांची प्रकृती ठिकठाक झाली असून, १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ३३ रुग्ण आहेत. हे रुग्ण पनवेल, उरण, श्रीवर्धन तालुक्यात सापडले आहेत.

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग ठिकठिकाणी पसरू लागला आहे. सुरुवातीला पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले होते, मात्र त्यानंतर पनवेल ग्रामीण, उरण व अत्ता श्रीवर्धन तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असून, नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच लागू केलेले निर्बंध पाळण्याची गरज आहे. सर्वत्र कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. कोरोना विषाणू वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र नागरिक सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच निर्बंध पाळत नसल्याचे दिसून येते.
 
रायगड जिल्ह्यात सापडलेल्या ३८  रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण पनवेल महानगरपालिका हद्दीत सापडले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीत आत्तापर्यंत ३१ रुग्ण सापडले असून, पनवेल ग्रामीणमध्ये ४, उरण तालुक्यात २ तर श्रीवर्धन तालुक्यात १ रुग्ण सापडला आहे. मात्र श्रीवर्धनचा हा रुग्ण मुंबईत राहत होता. त्याचे मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यात आहे.