रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १४६ वर – आज अलिबाग तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आज १८ रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे १४६ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये

 अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आज १८ रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे १४६ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महानगर पालिका ९, पनवेल ग्रामीण ७, उरण १ तर अलिबाग तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यात एक रुग्ण सापडल्याने कोरोनाने अलिबागमध्ये शिरकाव केला आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग ठिकठिकाणी पसरू लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यात आज १८  कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असून, नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच लागू केलेले निर्बंध पाळण्याची गरज आहे. रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत १४६ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल २, महाड १, पोलादपूर १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ८८ रुग्ण असून, यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील ६२, पनवेल ग्रामीण १९, उरण ३, श्रीवर्धन २, कर्जत १, अलिबाग १ रुग्णाचा समावेश आहे.

 रायगड जिल्ह्यात सुरुवातीला पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण सापडू लागले. पनवेल ग्रामीण, उरण, कर्जत, खालापूर, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व आज अलिबागमध्ये रुग्ण सापडल्याने अलिबागमध्ये कोरोनाची एन्ट्री झाली आहे.