आज पनवेल तालुक्यात १४, उरणमध्ये २१ आणि महाड तालुक्यात १ रुग्ण सापडल्याने रायगड जिल्ह्यात २५० कोरोनाबाधित

पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये १४ नवीन रुग्ण सापडले असून २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज खारघरमध्ये ६ कामोठे ५ आणि पनवेल कळंबोलीत प्रत्येकी १ कोरोना रुग्ण सापडला आहे. ग्रामीणमध्ये उमरोली

पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये १४  नवीन रुग्ण सापडले असून २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज खारघरमध्ये ६ कामोठे ५ आणि पनवेल कळंबोलीत प्रत्येकी १ कोरोना रुग्ण सापडला आहे. ग्रामीणमध्ये उमरोली येथे एका व्यक्तिला कोरोनाची बाधा झाली आहे.  महापालिका क्षेत्रात १३  नवीन रुग्ण सापडले . त्यापैकी ५ खारघरमधील एकाच कुटुंबातील आहेत. महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या १५६  झाली आहे. तालुक्यात कोरोनाचे २०४  रुग्ण झाले आहेत  तर ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात आज उरणमध्ये २१ आणि महाडमध्ये १ नवीन रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५०  झाली आहे.  

पनवेल महापालिका क्षेत्रात खारघरमध्ये सेक्टर ४ मधील साई मन्नत बिल्डिंगमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा कुटुंब प्रमुख मुंबईला सेबीमध्ये काम करीत असून त्यांना या आधीच कोरोनाची बाधा झाली आहे. खारघर सेक्टर २१ तपोवन सोसायटीमधील ४९ वर्षीय व्यक्ती ए.पी.एम.सी फ्रूट मार्केट मध्ये काम करते तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा . कामोठे सेक्टर ५ मधील मारुतीधाम सोसायटीतील २ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन्ही व्यक्ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत मानखुर्द शाखेत काम करीत आहेत. कामोठे सेक्टर २१ मधील गौरीशंकर सोसायटीतील पोलिस कर्मचार्‍याच्या कुटुंबातील २ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्या पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे. कामोठे सेक्टर ३६  मधील सूरज कॉम्प्लेक्स मध्ये राहणार्‍या मुंबईच्या के ई .एम रुग्णालयात स्टाफ नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. 
        कळंबोली सेक्टर ४ गुरुव्हीला कॉम्प्लेक्स मध्ये राहणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्स असलेल्या महिलेला कामाच्या ठिकाणी कोरोंनाचा संसर्ग झाला आहे. पनवेल मधील मध्यवर्ती भगत असलेल्या जोशी आळीतील सहयोग नगर मध्ये राहणार्‍या दादारच्या अदि फार्मसीत कामाला असणार्‍या व्यतीला कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे आज कोरोनाचे २० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. रविवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १४२५ जणांची कोरोनाची टेस्ट केली आहे. त्यापैकी २७  जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ८० जणांवर उपचार सुरू असून ६९  रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
          पनवेल ग्रामीणमध्ये आज उमरोली या गावात १ नवीन रुग्ण सापडलला आहे सादर रुग्ण मुंबईहून आपल्या गावाला आला होता आतापर्यंत ग्रामीण मध्ये  कोरोनाच्या ४८ रुग्णांपैकी ७ बरे झाले आहेत . रायगड जिल्ह्यात आज  उरण तालुक्यातील येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि क्वारंटाईन केलेल्या ७७ पैकी एकाचवेळी चार कुटुंबातील २१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १० महिला, ६ पुरुष आणि १ महिन्यांपासून ८ महिन्यांपर्यंतच्या ५ लहान मुलांचा समावेश आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने उरण परिसरात खळबळ माजली आहे. महाड  तालुक्यातील कोकरे या गावातील तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . तो माणगाव येथील राठोड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. रायगड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २५० झाली असून बळींची संख्या १० झाली आहे.