corona

पनवेल (Panvel) : रायगड जिल्ह्यात (Raigad District) शुक्रवार १६ ऑक्टोबर  रोजी २३० नवीन रुग्ण (patients) आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ५१६४५  झाली असून जिल्ह्यात१४६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे २३० नवे रुग्ण सापडले असून ३१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल तालुक्यात १५२   नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १३१ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३ कर्जत २ , खालापूर आणि पेण येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण मध्ये २१, उरण १९, अलिबाग १५, पेण ११, खालापूर१०, रोहा ८, माणगाव ६, कर्जत ३, महाड २, पोलादापूर २ श्रीवर्धन  आणि म्हसळा मध्ये अनुक्रमे एक रुग्ण आढळला आहे. रायगड जिल्ह्यात १,८५,९५७  चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ५१,६४५ पॉझिटिव्ह आल्या आहेत. १८८ चाचण्यांचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४७६३८ जणांनी मात केली असून २८४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात१४६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.