दारु पिणाऱ्यांनी दारूवर पाण्यासारखा केला पैसा खर्च, शासनाच्या तिजोरीत रायगड जिल्ह्याने टाकली इतक्या कोटींची भर

कोरोनाची भिती मनात बाळगून प्रत्येकजण काही ना काही उदरनिर्वाहाचे साधन शोधत आहे.(liqueur sell in raigad) असे असले तरी दारू विकत घेण्याऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. मद्यपींनी वाईन (wine sell)३ लाख लिटर तर बिअर(beer sell) सर्वाधिक १ कोटी लिटर रिचवली आहे.

    हर्षल मोरे, अलिबाग:  कोरोनामुळे सामान्यांचे अर्थचक्र पार कोलमडून गेले असले तरी दारु पिणार्‍यांनी मात्र दारुवर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. त्यांनी वर्षभरात तब्बल १ लाख लिटर बियर तर ७१ लाख लिटर देशी दारु रिचवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत एकट्या रायगड जिल्ह्यातून ६९८ कोटी जमा झाले आहेत. जिल्ह्यात वर्षभरामध्ये ७१ लाख लिटर देशी दारु विकण्यात आली आहे. तर विदेशी ६५ लाख लिटर दारुची विक्री झाली आहे.

    कोरोना काळात दारूची दुकाने सहा महिने बंद होती. मात्र राज्याला मोठ्या प्रमाणावर कर मिळवून देणाऱ्या दारूची दुकाने खुली करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाला सुचविल्यानंतर पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्यात आली. त्यावेळी दुकानांच्या बाहेर स्वस्तधान्य दुकानाच्या बाहेर धान्य घेण्यासाठी गरीबांच्या रांगा लागतात तशाच प्रकारच्या रांगा दारू दुकानांच्या बाहेर लागू लागल्या होत्या.

    शासनाने यावर्षी जिल्ह्यासाठी ८०८ कोटीचे लक्षांक उत्पादन विभागाला दिले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत ६९८ कोटींचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासनाने दिलेले लक्षांक मार्च अखेरपर्यत पूर्ण होणार आहे.

    - क्रांती शेडगे, अधिक्षक, जिल्हा उत्पादन शुल्क

    संपुर्ण वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावात गेल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कंपन्या बंद पडल्या. रोजगार उपलब्ध न झाल्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढले. छोटे-मोठे व्यवसायही बंद पडले. उत्पन्नाचे साधन न राहिल्यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढले. घरांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असताना दारूची विक्री मात्र मोठ्या प्रमाणावर होत होती. कोरोनाची दुसरी
    लाट आल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

    कोरोनाची भिती मनात बाळगून प्रत्येकजण काही ना काही उदरनिर्वाहाचे साधन शोधत आहे. असे असले तरी दारू विकत घेण्याऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. मद्यपींनी वाईन ३ लाख लिटर तर बिअर सर्वाधिक १ कोटी लिटर रिचवली आहे. लॉकडाऊनच्या सात-आठ महिन्यात दारु पिणार्‍यांची आकडेवारी कमी झाली होती. मात्र पुढच्या चार महिन्यांत ही आकडेवारी बरोबरीला आली आहे.

    रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने नावाजलेला असल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. आधुनिकतेच्या नावाखाली अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये शेकडो लिटर दारू रिचविली जाते. याशिवाय जिल्ह्यातील बनावट दारूची खरेदी-विक्री होते ती वेगळीच आहे. रायगड पोलिसांनी अनेकवेळा अशी बनावट दारू पडण्यात यश संपादन केले आहे. वर्षभरात १ हजार ६५९ केसेस झाल्या असून ८८४ जणांना अटक केली आहे. या कारवाईत २ कोटी ९२लाखांचा  मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे.