mahad rto

महाड: रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर नुतन पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत काही कडक निर्बंध आखले आहेत.(raigad district police superintendent strict about traffic rules) जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात आली आहे.

महाड: रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत काही कडक निर्बंध आखले आहेत.(raigad district police superintendent strict about traffic rules) जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात आली आहे. महाड शहरामध्येही रहदारीच्या प्रमुख मार्गावर त्याच प्रमाणे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख नाक्यावर नाकाबंदी करून दुचाकी वाहनांसह चार चाकी वाहनांची तपासणी(vehicle checking in mahad) महाड पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.

मुंबई – गोवा महामार्गावर दैनंदिन होणारे लहान मोठे अपघात व त्यातून लोकांचे जात असलेले जीव तसेच काही अपघातग्रस्तांना होत येणारे कायमचे अंंपगत्व याचा विचार करून पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्था विना अपघात सुरळितपणे सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असल्याने आता महाड शहरात दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे.तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळा ,असे आवाहन वाहन चालकांना महाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यावर विविध महत्वपूर्ण प्रश्न हाती घेतले आहेत.त्यापैकी दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहन परवाना, वाहन चालविताना मोबाईलवरून बोलणे, ट्रिपल सीट प्रवास करणे आदी बाबी नाका बंदीच्या ठिकाणी तपासल्या जात आहेत व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.