रायगड जिल्ह्यात ५०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, २० जणांचा मृत्यू

पनवेल तालुक्यात ३२९ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ९, अलिबाग ३, पनवेल ग्रामीण व उरण मध्ये प्रत्येकी २ तर कर्जत , पेण ,माणगाव आणि सुधागड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.    

पनवेल : रायगड (Raigad ) जिल्ह्यात रविवार २७ सप्टेंबर  रोजी ५०२ नवीन रुग्ण  ( corona cases) आढळले असून २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५१९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची (Corona Virus) एकूण संख्या ४५५४४ झाली असून जिल्ह्यात १२२० जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल तालुक्यात ३२९ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ९, अलिबाग ३, पनवेल ग्रामीण व उरण मध्ये प्रत्येकी २ तर कर्जत , पेण ,माणगाव आणि सुधागड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण मध्ये ६६ , अलिबाग ५७ ,  पेण ३२, माणगाव १८ ,कर्जत १८ , रोहा ११ , खालापूर ९, महाड ८ , पोलादापूर ७ , तळा ५ , उरण४ , श्रीवर्धन २ , मुरुड  आणि सुधागड मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रायगड जिल्ह्यात १,५८,४५७  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४,५५,५४४ पॉझिटिव्ह आल्या आहेत २३१ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर ३९७५२ जणांनी मात केली असून ४५७२ रुग्णावर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात १२२० जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे