raigad girls participate in International Women's Virtual Webinar 2020 Summit

या वेबिनार मध्ये भारतातील २५ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमधून  तसेच ३५ देशांमधील ६२५+ भागातील महिलां सहभागी झाल्या होत्या. वेबिनार ची सुरुवात १२ वर्षाची उत्साही वक्ता शिफा जमादारच्या भाषणाने झाली.

रोहा : आंतरराष्ट्रीय महिला आभासी वेबिनार २०२० मध्ये ( International Women’s Virtual Webinar 2020 Summit) महाराष्ट्राच्या रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कु. तपस्वी गोंधळी आणि रोहा तालुक्यातील कु. सुचिता साळवी. यांनी भारताच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन समिटमध्ये भाग घेतला.

जागतिक युवा संघटना आणि भारतीय युवा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला आभासी युवा समिटचे हे भारतातील सर्वात मोठे वेबिनार आहे. मुख्य वक्ते म्हणून जागतिक युवा संघटनेचे अध्यक्ष डॉ जावेद जमादार सहभागी सर्व महिलांचे स्वागत करताना ते म्हणाले आज महिला समाजामध्ये विविध क्षेत्रात आपली प्रमुख भूमिका बजावीत आहेत. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान देशाच्या विकासाकरिता तथा महिलांच्या सक्षमीकरणाकरता मोलाचे ठरत आहे. महिला आज अभिमानाने बाहेर पडत आहेत; त्यांचा आर्थिक व  राजकीय दृष्टया विकास होत आहे.

कॉन्फरन्सचे प्रमुख पाहुणे कर्नाटकचे आयपीएस डीजीपी श्री भास्कर राव म्हणाले, आजच्या पिढीने आपल्याला सर्व महिलांना स्वातंत्र्य द्यायचे आहे, आपल्याला प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी पुरवाव्या लागतील, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना वागणूक द्यावी, महिला सशक्तीकरण होणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय महिलांच्या आभासी परिषदेसाठी हे भारतातील सर्वात मोठे वेबिनार म्हणून चिन्हांकित केले आहे. या वेबिनार मध्ये भारतातील २५ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमधून  तसेच ३५ देशांमधील ६२५+ भागातील महिलां सहभागी झाल्या होत्या. वेबिनार ची सुरुवात १२ वर्षाची उत्साही वक्ता शिफा जमादारच्या भाषणाने झाली. जगभरातील सर्व सहभागी महिलांनी आपापल्या विचारांची देवाणघेवाण केली.आणि महिलांनी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यां व उपाय योजना यावर चर्चा केली.

यामध्ये जनरेशन एक्वालिटी, स्त्री पुरुष समानता, महिला अधिकार,  महिलांचे मानसिक आरोग्य, महिला  शिक्षण यावर भाष्य केले गेले. यामध्ये होडा ताहा-लेबनान,
ज्युलियट तोचुकू इझे- आफ्रिका, मेर्वात गबाल्ला-इजिप्त, तौवरा म्सिस्का-मलावी’, गॅब्रिएल -यू.एस.ए, मा फातिमा रेक्टो-फिलिपिन्स, ओलिंदा फडझाई-झिम्बाब्वे,भारतातील तपस्वी गोंधळी-राष्ट्रीय युवा पुरस्कारथी, रिदम मल्होत्रा दिल्ली-द स्कील्ट स्कूल, डॉ. शीला जमाल रक्षपाल मेडिकल कॉलेज, डॉ.गयात्री जत, रैना खत्री टंडन-संस्थापक राइट टु डे ,  नेहा शक-राजस्थान,  प्रबळ कौर-पंजाब,  सुचिता साळवी-स्वयंसिद्धा संस्था,डॉ. रीठा दिनेश-केरळ,  शिफा जमादार-कर्नाटक, नताशा पल्लवी- यूएई, डी. अरुणा-तेलंगाना-CEO.अपना ग्रीन प्रॉडक्ट, डॉ. प्रियंका-छत्तीसगड,दिया शर्मा-दार्जिलिंग तसेच

ईराण,इजिप्त, नेपाल , चीन ,ऑस्ट्रेलिया, यु एस ए, युक्रेन, यु के ,पाकिस्तान, रशिया,सूदान, केनिया, अफगाणिस्तान, फिलिपिन्स, झिम्बाम्ब्वे, तंजनिया, बांग्लादेश, ज़ाम्बिया, कैमरून,लेबनान, सिएरा लियोन, दुबई, अलेक्जेंड्रिया, इत्यादी देश विदेशातील महिलानी आपले विचार मांडले. जागतिक युवा संघटनेचे प्रमुख संयोजक जे.एस.आर. अन्नामय्या यांनी हा भव्य कार्यक्रमाचे निवेदन केले.