देखभाल दुरुस्तीसाठी रायगड रोपवे १५ दिवस राहणार बंद; जाणून घ्या काय आहे कारण

नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी रोपवे ची दर तीन चार महिन्याने डागडुजी व दुरुस्ती करावी लागते. एप्रिल व में महिन्यात किल्ले रायगडा वर येणार्‍या पर्यटक व शिव भक्तांची संख्या जास्त असल्याने हा सुट्टीचा मोसम येण्यापुर्वी रोपवे ची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने दि ३ एप्रिल ते १८ एप्रिल २०२१ दरम्यान रोपवे ची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

    महाड : किल्ले रायगडावर जाण्यायेण्यासाठीची रोप वे सेवा ही दि ३ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. असे रायगड रोपवे चे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी प्रसिद्धी साठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. किल्ले रायगड वर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले त्याच प्रमाणे शारीरीक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या व्यक्तींना गडावर जाणे येणे शक्य झाले आहे.

    मात्र नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी रोपवे ची दर तीन चार महिन्याने डागडुजी व दुरुस्ती करावी लागते. एप्रिल व में महिन्यात किल्ले रायगडा वर येणार्‍या पर्यटक व शिव भक्तांची संख्या जास्त असल्याने हा सुट्टीचा मोसम येण्यापुर्वी रोपवे ची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने दि ३ एप्रिल ते १८ एप्रिल २०२१ दरम्यान रोपवे ची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल मिलेनियम प्रॉपर्टीज प्रा लि कंपनी मार्फत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.